शिलाई यंत्रावर शिवण करणे हे जिकरीचे व कौशल्याचे काम आहे. ते सरावानेच जमते.शिलाई सुरू करण्यापूर्वी जे कापड शिवायचे आहे त्याचे अनुरूप धाग्याची निवड(मॅचिंग) करून घेणे जरुरी आहे. कापड शिवल्यानंतर शिवण दिसायला नको अशी समजूत असते.शिलाई दरम्यान शिवणयंत्राने घालण्यात येणाऱ्या टाक्यास ‘टीप’ असे म्हणतात.ती टीपही कापडास बघून योग्य हवी.जास्त लांब टीप उसवण्याची भिती असते तर खूप आखूड टीपने त्या ठिकाणुन कापड (सुईने जवळजवळ छिद्रे पडल्याने) लवकर फाटण्याची शक्यता असते